जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्धिष्ठपूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी वर्गाला विविध योजनांच्या अनुषंगाने आढावा घेवून सूचना केल्या.

 

जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच बैठकीत पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याची तत्काळ पुर्तता करा. केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करताना त्यांची उद्द‍िष्ट्ये पुर्ण होत आहेत का याचीही खात्री करा. अश्या सुचना दिल्या

यावेळी जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, समितीचे सदस्य प्राची कानेकर, सागर पाटील, विजय भोजे, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.