कोल्हापूर:देशाचे पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे , माजी आमदार सुरेश हाळवणकर, सौ. मोश्मी आवाडे , महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला*.

हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ओठांवर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. तिरंग्याच्या तीन रंगांनी सजलेले रस्ते आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक यामुळे इचलकरंजीत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. 🇮🇳
या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती निष्ठा यांचा संदेश देण्यात आला. विशेषतः विद्यार्थी, युवक आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी तिरंगा हातात घेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. राष्ट्रध्वज हा केवळ ध्वज नसून भारताच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा, एकता-अखंडतेचा आणि राष्ट्राच्या स्वाभिमानाचा गौरवशाली प्रतीक आहे, हा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
यावेळी उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
