कदमवाडीतील लोळजाईदेवी मंदिराचा कलशरोहन व लोकार्पण सोहळा

म्हालसवडे / प्रतिनिधी

तेरसवाडी पैकी कदमवाडी ता. करवीर येथील ग्रामदैवत लोळजाई मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दि. ९ मे रोजी करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कळशरोहन करून संपन्न होणार आहे. या निमित्ताने येथील चार वाड्यामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

 

वास्तुशांती व मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून गेले दोन दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. शुक्रवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन लोळजाई देवी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले आहे.
इतिहास संशोधकांनी सलग पंधरा वर्षे करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील देवदैवतांच्या मूर्तीचां सखोल अभ्यास केला. कांचनवाडी येथील कामाक्षी देवी व कसबा आरळे येथील कामाख्या देवीचा इतिहास ग्रामस्थांना समजून सांगितला असून सध्या कदमवाडी येथील लोळजाई देवीचा इतिहास उलगडण्यात आला आहे. शेकडो धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासावरून लोळजाई देवी ही शक्तीपीठ देवता असल्याचे इतिहास संशोधक उमाकांत रानिंगा व प्रसन्न मालेकर यांनी सिद्ध केले आहे.

देवीचे ऐतिहासिक व धार्मिक महात्म्य प्राप्त झाल्यामुळे या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरली आहे. तेरसवाडी, कदमवाडी, मल्लेवाडी व भोगमवाडी या चारी वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या लोळजाई मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सत्तर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले मंदिर सध्या शिखरा सहित नवीन बांधण्यात आले आहे.

उद्या शुक्रवारी खासदार शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयवंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राहुल पाटील, विश्वास पाटील, उद्योगपती रामचंद्र भोगम, जयसिंग रायकर यांच्या सहित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर लोकार्पण सोहळा व गुणवंतांचा सत्कार आणि महाप्रसाद संपन्न होणार आहे.

🤙 9921334545