राज्यात लवकरच टीईटी परीक्षा

बेळगाव : राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. 

 

मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तर सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी असतात त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरती साठी मंजूर झालेला जागा रिक्त राहत आहेत.