पत्रकार अन्सार मुल्ला यांची कन्या शाहू हायस्कुल मध्ये प्रथम

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोल्हापूर मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील राजर्षी शाहू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी व पत्रकार अन्सार मुल्ला यांची कन्या नुतज अन्सार मुल्ला हिला दहावी मध्ये 93.20% गुण मिळाले आहेत. तसेच तिने शाहू हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. नुतज हिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील साळोखे, मुख्याध्यापक बी. आर. पाटील, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.