शांतीनिकतेनमध्ये बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या बीनिशचा करवीर तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने सत्कार

एका व्यापाऱ्याचा मुलगा सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून शांतिनिकेतनमध्ये प्रथम येतो, ही बाब गांधीनगर बाजारपेठेस प्रेरणादायी असून व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी काढले.

बिनिश रमेश वाच्छांनी याचा शिवसेना, विविध संघटना व व्यापारी वर्गातर्फे शांतिनिकेतनमध्ये ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मुलांनी यापुढे एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत गौरवास्पद कामगिरी करून दाखवावी, अशी आशा राजू यादव यांनी व्यक्त केली.

 

*दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, दीपक अंकल, किशोर कामरा, महेश सचदेव यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप कुकरेजा शिवाजी सलगर, श्याम धामेजा, विनोद तुलसानी यांच्यासह व्यापारी वर्ग, कामगार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*