कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज (शनिवारी) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ब्रेंट क्रूड १.१९ डॉलर्स (१.२३%) खाली ९५.७७ डॉलर प्रति बॅरल आणि WTI १.१८ डॉलर (१.३२%) प्रति बॅरल ८७.९० डॉलर्सनी विकलं जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.