भाजपाकडून वारकरी भाविकांना खिचडी वाटप !

कोल्हापूर (प्रतिनिधी): आषाडी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर श्री क्षेत्र नंदवाळ येथे दर्शनास निघालेल्या वारकरी व भाविकांना भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. येथील सानेगुरुजी वसाहत येथे या खिचडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी देवस्थान समीतीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडी, महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रमोद घुगरे अशोक देसाई, संजय सावंत, राजु मोरे, गायत्री राऊत,लता बरगे, माजी नगरसेविका संगीता सावंत, लक्ष्मी टेक विकास मंडळचे किरण मुरारी, शिवाजी देसाई, सचिन सावरकर, सज्जन पोवार, विजय कुंभार, विजय गवळी, सचिन जाधव, राजु साळोखे, शिवतेज सावंत, प्रकाश जुगळ,वरूटे साईप्रसाद,सुभाष साळोखे,संदिप सनमुख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.