एकोंडी:एकोंडी (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देव हे ग्रामस्थांसह पंचक्रोशीचे श्रद्धास्थान. नागपंचमी दिवशी भाविक-भक्त मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज एकोंडी येथे दाखल होत श्री नागनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने श्री. नागनाथ मंदिरात मंत्री श्री. मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

उकडलेल्या करंज्यांचा प्रसाद….!
आज नागपंचमी निमित्त सर्वत्र उकडलेल्या करंज्यांचा प्रसाद दाखविला जातो. ग्रामस्थांनी आणलेल्या उकडलेल्या करंज्यांचा प्रसाद मंत्री श्री. मुश्रीफ यांना दिला. श्री. मुश्रीफही मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने हा प्रसाद खाऊन तृप्त झाले.
यावेळी बाबुराव घडमोडे, सुरेश बोभाटे, भागोजी मगदूम, सदाशिव घडमोडे, मारुती मगदूम, साताप्पा मगदूम, संजय घडमोडे, प्रकाश मगदुम, सागर मगदुम, तानाजी ढेरे, वैभव फासके, महेश मर्दाने, संजय पाटील, सातापा पाटील, चंद्रकांत गुरव, नामदेव खोंद्रे, गौरव बोभाटे आदी प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.
