राहुल पाटील यांच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप !

कोल्हापूर (प्रतिनिधी): आषाडी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर श्री क्षेत्र नंदवाळ येथे दर्शनास निघालेल्या वारकरी व भाविकांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. नंदवाळ (ता.करवीर) येथे या खिचडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोकुळ दुध संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन उदयसिंह पाटील,  जिल्हा नियोजन समिती सदस्य क्रांतीसिंह पवार पाटील, बाजीराव खाडे, मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे,  संजय गांधी निराधार अध्यक्ष संदीप पाटील, शिवाजी कारंडे, बी.ए.पाटील, शिवाजी पाटील, सत्यजित पाटील, चेतन पाटील, अविनाश पाटील, विजय भोसले, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.