कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकने कर्जावरील व्याजदर कमी करून तो १० टक्क्यावर आणला आहे. त्याच बरोबर महिला ठेवीदारांसाठी मुदतबंद ठेवीवर ०.२५ टक्के ज्यादा व्याजदर दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
प्राथमिक बँक ही शिक्षकांची स्वप्न पूर्ण करणारी महाराष्ट्रातील शिक्षकांची अग्रगण्य बँक असून बँकेने सभासदांच्या हिताच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या कर्जदारांसाठी सर्व प्रकारच्या कर्जावर अर्धा टक्का व्याज दर कमी करून दहा टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महिला ठेवीदारांना मुदतबंद ठेवीवर ०.२५ टक्के ज्यादा व्याजदर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याची अमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून केली जाणार आहे.
यावेळी चेअरमन स्मिता डिग्रजे, व्हाईस चेअरमन बजरंग लगारे, संचालक राजमोहन पाटील, ,नामदेव रेपे, ,संभाजी बापट, ,गणपती पाटील, ,साहेब शेख, आण्णासो शिरगावे, ,दिलीप पाटील, ,शिवाजी पाटील, ,प्रशांत पोतदार, ,अरुण पाटील, ,बाजीराव कांबळे, ,प्रसाद पाटील, ,डी. जी. पाटील, ,सुरेश कोळी, ,लक्ष्मी पाटील, ,तज्ञ संचालक संदीप पाटील, ,डी. पी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. मगदूम आदी उपस्थित होते.