रयत शिक्षण संस्था धनदांडग्यासाठी नव्हे तर गोरगरीबांसाठी : संपतराव पवार-पाटील

सरुड : नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अत्यंत जागरुक राहून काम करावे लागेल. रयत शिक्षण संस्था धनदांडग्यासाठी नव्हे तर गोरगरीबांसाठी आहे असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यालयात रयत बँकेचे माजी अध्यक्ष राजाराम मगदूम यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व माजी प्रकुलगुरु अशोक भोईटे प्रमुख उपस्थित होते.

अशोक भोईटे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी घालून दिलेल्या पायवाटेवरुन जावून रयतच्या अनेकांनी आपली सेवा बजावली. तर डॉ. एन .डी. पाटील यांच्या आदर्शाचा वस्तुपाठ आपणास यापुढेही कार्यातून चालवावा लागेल. राजाराम मगदूम त्यांचे पायीक शोभतात.

सुत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी तर प्रास्ताविक आर. एल. पाटील यांनी केले. यावेळी राजाराम मगदूम, भाई भारत पाटील, प्राचार्य डॉ. आय .एच. पठाण, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटील, कृष्णात रोडे, प्रा .डॉ. सुरेखा पाटील, गोपाळ पाटील, संजय पाटील, कुमार जाधव, बी. बी. लगारे, एम. बी. शेख,  बाळासाहेब नाईकवाडी, अशोक चव्हाण यांची मनोगते झाली.