शक्तीप्रदर्शनाने भाजपच्या सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आज बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐतिहासिक दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने रॅली काढली.

यानंतर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे,  राहुल चिकोडे,  आमदार प्रकाश आवाडे,  माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, आरपीआय (आठवले गटाचे) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींसह भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.