कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी कोल्हापूर एस.टी.स्टँड येथून दर रविवारी केएमटीची बस सेवा सुरु करणेत आल्याची माहिती केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव यांनी दिली.
दर रविवारी सकाळी एस.टी.स्टँड व शिवाजी चौक येथून सकाळी ५.५० वाजल्यापासून दर अर्ध्या तासाच्या अंतराने जोतिबा येथे जाणेसाठी बस सेवा सुरू राहणार असून याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरव यांनी केले आहे.