बजेटमध्ये गुडन्यूज …

नवी दिल्ली: बजेटमध्ये गुडन्यूज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच महिलांविषयी या दहा वर्षात काय काय पावलं टाकण्यात आली, याची उजळणी अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.

3 कोटी लखपती दीदी योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताच्या विकासाची गेल्या दहा वर्षांतील आलेखाचा उल्लेख केला. युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांवर कशाप्रकारे मोदी सरकारने लक्ष केंद्रीत केले. त्यांच्यासाठी काय काय उपाय योजना राबविल्या याची माहिती दिली. अगोदर नागरिक आणि नंतर सरकार असे धोरण सरकारने राबविल्याचे त्यांनी सांगितले. देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेत सहभागी करुन लखपती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेत आरक्षणासाठी कायदा

केंद्र सरकार संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी बजेट भाषणात दिली. तसेच तिहेरी तलाक प्रथा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. पीएम आवास योजनेतंर्गत 70 टक्के घरं महिलांना देण्याचे त्यांनी जाहीर केले. महिलांच्या विकासासाठीच्या इतर अनेक योजनांची उजळणी त्यांनी केली.

फोल ठरल्या अपेक्षा

या बजेटमध्ये महिला, शेतकरी महिला, शेतकरी, तरुण आणि गरीबांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता पार निकाली निघाली. अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा न करता, केवळ खर्चाची तरतूद करण्यात येते. ही परंपरा कायम ठेवण्याचे संकेत अगोदरच अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण करदात्यांना आणि सर्वसामान्यांना या बजेटमध्ये काही ना काही मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कोणतीच मोठी घोषणा न करता पंरपरेचे पालन केले.

योजनांचा असा झाला फायदा

पीएम जनधन योजनेचा आदिवासी समाजाचा फायदा

पीएम किसान योजनेतंर्गत 11.8 कोटी लोकांना अर्थसहाय्य

4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा झाला लाभ

देशातील 78 लाख फेरीवाल्यांना मदतीचा हात

केंद्रीय बजेट 2024 चे संपूर्ण कव्हरेज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा