कोल्हापूर ‘उत्तर’ची पोटनिवडणूक जाहीर; १२ एप्रिलला मतदान

नवी दिल्ली : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दि. १२ एप्रिलला मतदान होणार आहे तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील कोल्हापूरसह पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार पाच राज्यांतील विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. १७ मार्चपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २४ मार्च आहे. तर २५ मार्चला छानणी होणार आहे. २८ मार्च अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. १२ एप्रिलला मतदान होणार आहे तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.