अज्ञात वाहनाच्या धडकेने केनवडेतील काका-पुतण्या जागीच ठार

सिध्दनेर्ली (प्रतिनिधी) : कागल- मुरगुड रोडवर व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याजवळ अज्ञात वाहनाचे जोरदार धडक दिल्याने केनवडेतील काका -पुतण्या जागीच ठार झाले. बापू यशवंत तळेकर (वय 50) व सुरेश दिनकर तळेकर (वय 29 ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.


अधिक माहिती अशी, बापू यशवंत तळेकर व सुरेश दिनकर तळेकर हे काका- पुतणे जवाहर साखर कारखान्यावर कामाला होते. ते रात्री 8 ते पहाटे 4 ची शिप्ट करून आपल्या केनवडे गावाकडे परत जात असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. आज पहाटे पाच वाजणेच्या दरम्यान कागल मुरगुड रोडवर खोत मळ्ताजवळ त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते दोघे जागीच ठार झाले तर त्यांची मोटरसायकल जवळपास शंभर फुट फरफटत गेलीं होती.