कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शनासाठीची ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हा प्रशासनाने घेतला. तर रात्री अंबाबाई मंदिराचे सर्व दरवाजे रात्री 9:30 वाजता उघडण्यास आले.
जोतिबा मंदिरातील दर्शनासाठी ई-पासची बंद करावी तसेच चारही दरवाजे खुले करावेत या मागण्यांसाठी जोतिबा मंदिरासमोर जोतिबा ग्रामस्थ, पुजारी, दुकानदार यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा करून जोतिबा मंदिरातील दर्शनासाठीची ई-पास मागे घेण्यासह मंदिराचे चारही दरवाजे खुले करण्याचे निर्देश दिले. खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सुध्दा या संदर्भात प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता. जोतिबा डोंगरा वरील पुजारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळं जोतिबा मंदिरासह करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शनासाठीची ई-पास प्रणाली सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आज सायंकाळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे सर्व दरवाजे रात्री 9:30 वाजता उघडण्यास आले.