बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावा घेणार : संजय माळी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभाग कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक आस्थापनेच्या नोंदणीबाबतचे निवेदन आज कोल्हापूर येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांना देण्यात आले.

यावेळी मनसे रोजगार विभागाचे कोल्हापूर जिल्हा संघटक राजेंद्र निकम, उपजिल्हा संघटक शहाजी भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिरुद्ध पाटील, तालुका संघटक राहुल दवडते, पन्हाळा तालुका संघटक दीपक पाटील, इचलकरंजी शहर संघटक जेम्स तडाखे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.