इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाप्रत्यर्थ इचलकरंजी भाजपकडून येथील मलाबादे चौकात जल्लोष करत नागरिकांना लाडू, साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
चार राज्यांमध्ये भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने इचलकरंजी शहरात भाजप पक्षाच्या वतीने मध्यवर्ती के. एल. मलाबादे चौकासह शिवतीर्थ परिसर भाजप पक्ष कार्यालय यासह विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी नागरिकांना लाडू, साखर- पेढे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अध्यक्ष अनिल डाळ्या,माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन,सतिश डाळ्या, माजी नगरसेवक किसन शिदे, मनोज हिंगमिरे, मनोज सांळुखे, धोंडीराम जावळे, अरविद शर्मा, शशिकांत मोहिते, अरुण कुंभार, राजेंद्र पाटील, दिपक पाटील, उमाकांत दाभोळे, रिषभ जैन, विनोद कांकाणी, प्रितम बोहरा, बाळकृष्ण तोतला, सागर कचरे, अमर कांबळे, म्हाळसाकांत कवडे, जयवंत पाटील, सचिन माळी, पुनम जाधव, अश्विनी कुबडगे, योगिता दाभोळे, निता भोसले , निर्मला मोरे, अनिता कुरणे, नागुताई लोंढे, कौशला गाडे, गंगा पाटील, भारती पाटील, किरण दंडगे, बाळु ओझा आदीसह, कार्यकर्ते उपस्थित होते.