मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ शेअर बाजाराला बसून आज मोठी घसरण होऊन शेअर बाजार गडगडला. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही ४५९ अंशांनी पडझड झाली.
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे. निक्केईमध्ये घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध झाल्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे.