मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोरोना अहवाल आज (मंगळवारी) पॉझिटीव्ह आला आहे. लता मंगेशकर यांना उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर ९२ वर्षाच्या आहेत.
अधिक माहिती अशी की, लता मंगेशकरांना आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचं सांगितलं होतं.
लता मंगेशकर यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत तब्बल एक हजाराहून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. याशिवाय मराठी आणि इतर भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली आहेत. यश चोप्रा यांचा २००४ मध्ये आलेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. ३० मार्च २०२१ ला हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘सौगंध मुधे इस मिट्टी की’ हे गाणं भारतीय लष्कराला समर्पित करण्यात आलं होतं.
दरम्यान लता मंगेशकर यांनी पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याशिवाय राष्ट्रीय तसंच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.