पुण्यात ओमायक्रॉनचे नवे १२ रुग्‍ण

पुणे प्रतिनिधी : पुण्यात कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातही आलेले नाहीत, अशा ६०० नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण पुण्यातील प्रयोगशाळांनी करण्‍यात आले. त्यापैकी १२ रुग्णांचे अहवाल ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली असल्याची पुष्टी आरोग्य विभागाने दिली आहे.

पुण्यातील १२ ओमायक्रॉनबाधित नमुन्यांपैकी ६ नमुने हे गेल्यावर्षी २९ डिसेंबरला पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये पुणे शहर २, पिंपरी चिंचवड ३ आणि पुणे ग्रामीणमध्ये १ असे होते. हे सर्व नमुने पुण्यातील भारतीय विज्ञान व संशोधन संस्थान (आयसर) ने रिपोर्ट केले आहेत. दरम्यान, रविवार (दि.२) आणखी ६जणांचे अहवाल ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये ३, पिंपरी चिंचवडमध्ये २ आणि पुणे शहरातील १ असे नमुने आहेत.