‘या’ सुप्रसिद्ध फुटबॉलस्टारला कोरोनाची लागण

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अर्जेंटीना संघाचा कर्णधार तसेच फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणारा लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे.

मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील मेस्सीसह चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. पीएसजी संघातील मेस्सीसह जुआन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजाला यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

नुकताच बार्सिलोना संघातून पीएसजी संघात आलेल्या मेस्सीने मानाचा ‘बॅलन डी’ओर हा पुरस्कार सातव्यांदा पटकावला होता. सध्या मेस्सी संघासोबत फ्रेंच कप खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यांतर पीएसजी संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. खेळाडूंसह काही स्टाफ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सीसह संघातील कोरोनाबाधित सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचं पीसएजी संघानं सांगितलं आहे.