चिंताजनक ! कोल्हापुरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉन रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवाशी आहे.

त्याने कोणताही प्रवास केलेला नाही. एका कार्यक्रम सोहळ्यासाठी त्यांची मुलगी गोव्याहून आली आहे. यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तसेच संबंधित व्यक्ती एका कार्यक्रम सोहळ्यासाठी गेले होते. तेथे त्यांना ओमायक्रॉनची लागणी झाली असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण आहे. पहिल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.