चिंताजनक ! कोल्हापुरात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवारी ) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यात आज कोरोना बाधित २१ रुग्ण आढळून आले.

यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक जास्त म्हणजे १३ रुग्ण आढळून आले. तर कोरोनातून बरे झालेल्या दहा रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत २,०७,०३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ हजार १९२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दिवसेंदिवस देशातील, राज्यातील किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे न्यूज मराठी २४ तर्फे आपणास आवाहन करण्यात येत आहे.