पश्चिम बंगाल सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय !

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ कोरोना रूग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये उद्या (३ जानेवारी) पासून राज्यातील शाळा बंद करण्यात येणार आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. या निर्णयामुळे सोमवारपासून (३ जानेवारी) पश्चिम बंगालमध्ये शाळा, महाविद्यालयांसोबतच जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्युटी सलून्स देखील बंद राहतील.