माणुसकीच्या दुनियेतील हायवे  मृत्युंजय दूतांचे समाजकार्य प्रेरणादायी: सपोनि चंद्रकांत शेडगे

सपोनि सी. बी. शेडगे,माजी प्राचार्य प्रशांत सालीयन ,सपोनि श्रीमती के. एस. नाईक,पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नलवडे,पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शिरगुप्पी,पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. माळगे,पोलीस उपनिरीक्षक एम. एच. जिरगे व मान्यवर उपस्थित होते.

गांधीनगर: महामार्गावरील  हायवे मृत्युंजय दूत हे  पहिल्या तास- दीड तासात म्हणजेचं “गोल्डन हवर’ मध्ये जखमींना प्रथमोपचार  मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी ते   देवदूतांची भूमिका निभावत आहेत.

माणुसकीच्या दुनियेतील हायवे  मृत्युंजय दूतांचे समाजकार्य प्रेरणादायी आहे.असे मत उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी केले.उजळाईवाडी पोलीस मदत केंद्राच्या वतीने राज्य वाहतूक महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या प्रेरणेतून  महामार्ग मृत्युंजय दूत’ ही संकल्पना १ मार्च पासून सुरू आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील  उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राअंतर्गत १४६ मृत्युंजय दूत  कार्यरत आहेत.त्यापैकी १२३ मृत्युंजय दूताची ओळखपत्र  तयार होऊन १०३  मृत्युंजय दूतांना वाटप प्रसंगी  ते बोलत होते.यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा विषयी माहिती देण्यात येऊन प्रथोमोपचार बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

जळाईवाडी महामार्गावरील महामार्ग मृत्युंजय दूतामुळे  महामार्गावरील  अपघात  वेळी  जखमींना तातडींने मदत मिळत  आहे. जखमीचे  प्राण वाचत आहेत. राज्यभरात ‘मृत्युंजय दूत ’ हे  स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्याने यांचा लाभ पोलीस प्रशासनाला व जखमींना होत आहे.

मृत्युंजय देवदूतांच्या समूहाकडे स्ट्रेचर व प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. महामार्गांवरील हॉस्पिटलची नावे व त्यांचे संपर्क क्रमांक आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची माहिती आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असलेल्या गावातील स्थानिक ग्रामस्थ, ढाबे व पेट्रोल पंपचे कर्मचारी, यांना विशेष प्रशिक्षण देऊन जखमींवर प्रथोमोपचार कसे करावेत, त्यांना कसे हाताळावे याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. मृत्युंजय दूतांचे जाळे संपूर्ण राज्यभरात तयार केले जात आहे. उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने महामार्ग हायवे मृत्युंजय दूतांना ओळख पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी  इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे माजी प्रभारी प्राचार्य प्रशांत सालीयन , सपोनि श्रीमती के. एस. नाईक, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नलवडे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शिरगुप्पी, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. माळगे, पोलीस उपनिरीक्षक एम. एच. जिरगे, यांच्यासह सहाय्यक फॊजदार शंकर कोळी, ठाणे अंमलदार श्रीकांत शिंदे, ठाणे अंमलदार राहुल देसाई, ठाणे अंमलदार भरत कांबळे, यासह पोलीस कर्मचारी विशाल बद्रे,राहुल महाजन, विजय कोळी,सुरजित माने, तात्यासो मुंडे,संदीप पाटील,सर्जेराव पाटील,अझरउद्दीन खतीब, आशिष कोळेकर, तौसिफ मुल्ला, कारंडे सर, मृत्युंजय दूत मोहन सातपुते, किरण आडसूळ, संदीप संकपाळ यांचे सहकार्य लाभले. यावेळी  मृत्युंजय दूत उपस्थित होते.