जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 15 फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी सर्व शाळांना आज लागू केला.शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद बाबतचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.


या आदेशामध्ये असे म्हटले आहे, जिल्हयातील शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे बंद राहतील. विविध शैक्षणिक बोर्डाकडून कडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यासाठी राबवायचे उपक्रम सदर कालावधीत शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू असणार आहे. तसेच शालेय वेळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १०० % उपस्थित राहून प्रशासकीय कामकाज व इ.१० वी व इ. १२ वी ऑनलाईन/ ऑफलाईन, प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षा विषयों कामकाज तसेच इतर इयत्तांचे ऑनलाईन अध्ययन अध्यापन व लसीकरणासाठीशाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणां कडून विशेषत्वाने सूचित केलेलेकिंवा परवानगी दिलेले उपक्रम करावयाचे आहेत.

तसेच वय वर्ष १५ ते १८ या वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा लसीकरणासाठी पुर्वनियोजित वेळ देणेत आलेली आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त लसीकरणासाठी शाळा , महाविद्यालयात येणेसपरवानगी असेल, इ. ५ वी ते १ व ११ वी चे ऑनलाईन शिक्षण सुरळीतपणे चालू राहील व १००% मुले ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध राहतील याची दक्षता सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेणेची आहे. इ. १० वी व इ. १२ वी मध्ये शिकणान्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाच्या परीक्षाविषयक कामकाजासाठी उपस्थित राहणेची मुभा राहील, आरोग्य विभागाने कोविडच्या अनुषंगाने दिलेल्या सर्व निर्देशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. असेही या आदेशात म्हटले आहे.