जागर तर्फे गट विकास अधिकारी यांना बाल संरक्षण समिती सक्षमीकरण करणे बाबतचे पत्र सादर

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून बालविवाह, मुलांवरील अत्याचार, मुलामुलींचे पळून जाणे अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहे. काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या अशा मुलांसाठी प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती असते पण ही समिती फक्त कागदोपत्रीच असल्याचे अवनि संस्थेच्या सर्व्हे मधून समोर आले आहे.

त्यामुळे अवनि संस्थेच्या जागर प्रकल्प मार्फत करवीर, पन्हाळा व शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये समिती सक्षम करून त्या अंतर्गत मुलांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात ही या समिती सक्षम करण्याबाबत पत्र देण्यात आले. यामध्ये शिरोळ चे गट विकास अधिकारी श्री शंकर कवितके. पन्हाळा चे गट विकास अधिकारी श्री तुळशीदास शिंदे यांना भेटून तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामसेवक व सरपंच यांना ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन व सक्षम करण्याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, सिद्धांत घोरपडे यांनी पत्र दिले. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले उपाध्यक्ष संजय पाटील, अभिजित जाधव याचे सहकार्य लाभले.