बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं सत्य आलं समोर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी  हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. रावत यांच्यासह लष्करातील १४ अधिकाऱ्यांना देशाने गमावले. या हेलिकॉप्टर अपघाताला अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले.

अपघातानंतर हेलिकॉप्टर अपघाताच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. या तपासामध्ये मोठे कारणं समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं क्रॅश झाल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आलं आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीनं ‘खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला.’ असे म्हटले आहे. मात्र, वायुसेनेच्या वतीनं अहवालाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकोशी पूर्ण केली असून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे.