वेळ पडली तर मंत्रिपदाचा त्याग करणार : ना. विजय वडेट्टीवार

बुलढाणा प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणासाठी वेळ पडली तर मंत्रिपद देखील सोडेल असा सूचक इशारा ना.विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला आहे असं वक्तव्य ना.वडेट्टीवार यांनी केलं आहे.

कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसतात काहींनी ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटलं होतं’ अस बोलत फडणवीस यांना देखील डीचवल. तर ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी मी मंत्रिपद देखील त्यागू शकतो असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला. जर महाराष्ट्र सरकारकडून ओबीसींवर अन्याय झाला तर मी काय करावं? हे मुख्यमंत्री यांना विचाराव लागेल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्य सरकारचा हा प्रस्ताव फेटाळत निवडणुका निश्चित वेळेनुसारच होणार असल्याचं म्हटलं. त्यानुसार २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडल्या आहेत. तर, ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहेत.