कसबा बावडा : राजाराम कारखान्याची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होऊन सभेचे कामकाज तब्बल दीड तास चालून खेळीमेळीत संपन्न झाली. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या…
Author: Team News Marathi 24
सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात झटका; कर्जाचे हप्ते महागणार
नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचं संकट घोंगावत असताना आरबीआयने आणखी एक धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दरांत ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली असून यामुळे कर्जाचे हप्ते महाग होणार आहेत.…
खा.धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट !
कोल्हापूर प्रतिनिधी : ८० लाख टन साखर निर्यात आणि व्याज अनुदान योजनेला मुदतवाढ मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखानदारी संक्रमणावस्थेतून जात आहे. कधी ऊसाचे अतिरिक्त उत्पादन, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला मागणी नाही, तर कधी ऊसाची टंचाई आणि साखरेला मागणी जास्त असे व्यस्त प्रमाण बघायला मिळते. सुदैवाने गेल्यावर्षी देशातील सहकारी साखर कारखानदारीला केंद्र सरकारच्याअनुकूल धोरणांचे पाठबळ मिळाले. या पार्श्वभूमीवरआज खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय वाणिज्य तथा अन्न आणि वितरण खात्याचे मंत्री नामदार पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, गोदावरी बायोरिफायनरीचे अध्यक्ष समीर सोमय्या, लोकमंगल ग्रुपचे महेश देशमुख, गंगामाई शुगरचे अध्यक्ष रणजित मुळे, रोहीत नर्हा आदी उपस्थित होते. यावर्षी भारतातील सर्व साखर कारखान्यांकडून किमान ८० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी आणि कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प किंवा डिस्टेलरी उभारणीसाठी घेतलेल्या कर्जावरील, व्याज अनुदान योजनेची मुदत वाढवावी, या प्रमुख दोन मागण्यांसाठी ही भेट घेण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे सहकारी साखर कारखानदारीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. गेल्यावर्षी केंद्र सरकारने ओपन जनरल लायसन धोरणानुसार, देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यात करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे संपूर्ण …