विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत एनएसएसचे महत्वपूर्ण योगदान : डॉ. व्ही. एन. शिंदे


कसबा बावडा (वार्ताहर) : राष्‍ट्रीय सेवा योजना (एनएसएस) राष्‍ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांची जडण-घडण व व्यक्तिमत्त्व विकासात एनएसएसचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते.


राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानता राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. सामजिक जाणीव अधिक समृद्ध होते, असे डॉ. शिंदे म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारे बदल याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी करून दिली. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल पाटील, डॉ. नवनीत सांगले, प्रा. संकेत शिंदे यांच्याबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे 185 स्वयंसेवक उपस्थित होते. संकेत चौगले, सौरभ केसरकर, वैभव नगने, धनश्री बोडेकर, पूनम पाटील, अक्षता कवठेकर या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.