आ.सतेज पाटील यांची महाडिकांवर ‘या’ शब्दांत टीका

कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील छत्रपती राजाराम कारखान्याची शुक्रवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल.ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया,असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीत झालेल्या कारखाना सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते.

पाटील यांनी राजाराम कारखान्याचे १३४६ सभासद न्यायालयाने अपात्र ठरविले. हे सभासद अपात्र करण्यासाठी न्यायालयात झालेल्या त्रासाबाबत सभासदांना माहिती दिली. परिवर्तनाची पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे, असेही ते म्हणाले.

गेल्या पंचवीस वर्षांनंतर आता होणाऱ्या सभेसाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. भगवानराव पवार यांनी साखर कारखाना चालवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाला. राजाराम साखर कारखान्याच्या सातबारावर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल तर परिवर्तन घडवूया. विजय टप्प्यात आहे, त्यामुळे आजपासूनच प्रयत्न चालू ठेवा असेही सतेज पाटील म्हणाले.