कोल्हापूर:लाल मातीच्या गंधाने दरवळणाऱ्या आणि कुस्तीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या करवीर तालुक्यातील आमशी गावी एका नव्या क्रीडा अध्यायाची सुरुवात झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या १० लाख रुपयांच्या नवीन कुस्ती मॅट आखाड्याचे पूजन खा . धनंजय महाडिक यांनी केले.

ग्रामीण भागात कुस्तीची प्रचंड आवड आहे. मातीतल्या कुस्तीसोबतच आपल्या तरुण पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरील कुस्तीचा सराव करता यावा, ही काळाची गरज ओळखून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. फडणवीस साहेबांनी ग्रामीण भागातील या खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून तात्काळ १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
या अत्याधुनिक सुविधेमुळे आमशी आणि परिसरातील ग्रामीण मल्ल केवळ स्थानिक कुस्त्यांपुरते मर्यादित न राहता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी खा.महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी मा. राजू सूर्यवंशी, मा. प्रकाश मुगडे, सरपंच मा. आरती सावंत, मा. भगवान गुरव, मा. आर टी पाटील, मा. रामनाथ पाटील, मा. जयदीप पाटील, मा. पंढरी पाटील, मा. तानाजी पाटील, मा. बाजीराव कांबळे, मा. निखिल पाटील, मा. सरदार सावंत, मा. प्रकाश पाटील, मा. सुशीला पाटील, मा. नितीन पाटील, मा. नवनाथ कदम, मा. शिवाजी पाटील, मा. प्रकाश पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व कुस्तीमल्ल उपस्थित होते.
