कोल्हापूर:कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने 587.96 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संस्कृती, क्रीडा, पर्यटन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उद्घाटने आणि भूमिपूजन रविवारी 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.


1. महानगरपालिका वाहनतळ- महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 30.60 कोटी खर्चून बहुमजली पार्किंग इमारत उभारली आहे.
2. गोकुळ हॉटेल परिसरातील मेकॅनिकल पार्किंग – 8.40 कोटी रुपये खर्चून येथे आधुनिक पार्किंग उभी राहिली आहे.
3. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळाचा विकास– नरसी बाग येथे 8.40 कोटी खर्चून विकासकामे झाली आहेत.
4. रंकाळा तलाव सुशोभीकरण – 5 कोटी रुपये खर्चून रंकाळा परिसर अधिक आकर्षक करण्यात आला आहे.
5. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी – 25.10 कोटी खर्चून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवे नाट्यगृह तयार झाले आहे.
6. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम – 6.66 कोटी खर्चून क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी स्टेडियममध्ये नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
7. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प– पर्यावरण संवर्धनासाठी 92 कोटी खर्चून 9 MLD क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पांमुळे शहराचा विकास होणार असून नागरिक, भाविक, पर्यटक आणि खेळाडूंनाही मोठा फायदा होणार आहे. शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देणे हा या मागचा उद्देश आहे.
