मुंबई : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री यांनी मंत्रालयात ही यादी प्रसिद्ध केली. दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला.

मात्र पहिल्या यादीत केवळ 933 शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रांतिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी अद्याप प्रांतिकर विभागाकडून प्राप्त न झाल्याने पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या 933 पात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांची माहिती प्राप्त होताच पुढील टप्प्यातील याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जाणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
