राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर : राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर (राज्यमंत्री दर्जा) हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .सोमवार, दिनांक 1 जून 2026 रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह आगमन, राखीव व मुक्काम.

 

             मंगळवार, दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे सफाई कर्मचारी यांच्या संघटने सोबत बैठक व राखीव. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात, कोल्हापूर येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरीता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक. बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 3 ते 4 वाजे पर्यंत आयुक्त, महानगरपालिका, कोल्हापुर यांच्या समवेत National Action for Mechanized Sanitation Ecosystem (NAMASTE) ची कोल्हापुर जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.3950/202 व सिव्हील अर्ज क्रमांक 15434/2023 मधील निर्देशानुसार करण्यात आलेली कार्यवाही लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करणे साठी करण्यात आलेल्या उपाय योजना. आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद. सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत कोल्हापूर येथील सफाई कर्मचारी यांच्या वस्त्यांना भेट, सायंकाळी 5 नंतर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे मुक्काम.

         बुधवार, दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथून इचलकरंजीकडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत इचलकरंजी शासकीय विश्रामगृह येथे राखीव व संघटने सोबत बैठक. दुपारी 1 ते 2 पर्यंत मा. आयुक्त, महानगरपालिका, इचलकरंजी यांचे समवेत National Action for Mechanized Sanitation Ecosystem (NAMASTE) ची अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र. 3950/202 व सिव्हील अर्ज क्रमांक 15434/2023 मधील निर्देशानुसार करण्यात आलेली कार्यवाही लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करणे साठी करण्यात आलेल्या उपाययोजना. आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे मुक्काम.

0000

🤙 8080365706