कोल्हापूर: नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 31 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता चंदगड येथे आगमन व विविध कार्यक्रमास उपस्थिती, रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, चंदगड येथे आगमन व राखीव.
सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 8 शासकीय विश्रामगृह, चंदगड येथुन कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व नागरिकांच्या भेटीगाठीसाठी राखीव. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती व इतर बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, येथुन शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथुन छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूरकडे प्रयाण. रात्री 8 वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ येथे आगमन व रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
