
कोल्हापूर : मी कोल्हापुरात साठ वर्षे राहत होतो त्यावेळी मधून मधून मूळ गावी सोनाळीला येत असे आमच्या गल्लीतच बापू काका देसाई रहात. बापू काका म्हणजे बटू मूर्ती पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या घराघरात त्यांना कोण ओळखत नाही असे नसे .ते तर सरळ स्वयंपाक घरापर्यंत जात .आई ,ताई, माई, मावशी, आजी या साऱ्या बापू काकांना ओळखत आणि कुटुंबातलाच एक भाग म्हणून त्यांच्याशी घरगुती गप्पा होत असत .बापूकाका बिनकामाचे कधी येत नाहीत त्यांनी कुठली तरी चांगली स्थळ सुचवण्यासाठी ते विषय काढतात आणि मग चहापाणी होतं आणि तासाभरात बापू काका निरोप घेतात त्यावेळेला वधू वर सूचक मंडळ असं काही नव्हती आणि बापू काका जे सांगत त्यावर साऱ्यांचा विश्वासही बसे पण ते एक तासभराच्या गप्पा मधून त्यांनी काहीतरी निर्णय घेतलेला असतो आणि मग विवाह संबंध पक्के होतात मला वाटते असे शेकडो विवाह झोपडीपासून श्रीमंतांच्या हवेली पर्यंत केवळ बापू काकांच्या मध्यस्थीमुळे पार पडले आहेत आज बापू काका नाहीत , त्यांची उणीव जाणवते.त्यांचे चिरंजीव सयाजी आज 54 वर्षाचे आहे पण वाटतात चाळीशीतले. कदाचित कुठे थांबायचं आयुष्यात हे सयाजीना चांगलं कळतं आज गारगोटी मध्ये त्यांनी टोलेजंग अशा अनेक इमारतीं उभारल्या आहेत .त्यामुळे ग्रामीण भागातील एका छोट्या शहराचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला गारगोटीच्या वैभवात भर घातली आहे.

कोल्हापूर शहरासारखे अनेक ब्रँडेड कंपनीने आपली मोठी शोरूमस, कोल्हापूरचे अनेक डॉक्टर्सनी आपली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल त्यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये उभा केली आहेत ,प्लाझामध्ये उभा केली आहे त्यांनी उभा केलेल्या हॉटेलचा दर्जाही मुंबई गोव्याच्या पर्यटकांना पसंत पडलेला आहे महसूल विभागातील आणि प्रशासनातील ताकद आणि दुर्बलता सयाजींनी चांगली जोखली आहे त्यामुळे रियल इस्टेटची त्यांनी गती पकडली आहे ती आश्चर्यकारक आहे पण त्यामुळे सयाजीना कुठेही अहंकाराची बाधा झालेली दिसत नाही .गरीब भाऊबंदानाही चांगली घरे बांधून देण्याची दानत ही त्यांच्याकडे आहे प्रारंभी राजकारणामध्ये उतरून आपण काहीतरी आपल्या गावचे भले करू असे त्यांना वाटत होते पण तो माझा भ्रम होता अशी प्रांजल कबुली ते आज देतात अजूनही इथल्या लोकांची मानसिकता बदलायला हवी असे त्यांनी नोंदवले.जेव्हा मी विषय काढला गारगोटीला अतिक्रमणाचा वेढा खूप आहे कचऱ्याचे ढीग आहेत नदी अधिकाधिक प्रदूषित होऊ लागली आहे आणि मोठमोठे इमारतींना ड्रेनेज शिस्त राहिलेली नाही त्यामुळे भवितव्यामध्ये हे अधिकाधिक बकाल शहर होईल की काय असे वाटते. त्या वेळेला त्यांनी हे स्पष्ट केले की मी माझ्या इमारतींचे पहिले ड्रेनेजची व्यवस्था ठीक करतो सिमेंट सळीचा दर्जा कायम राखतो म्हणून माझ्यावर एक प्रकारे बाहेरच्या ग्राहकांचाही विश्वास वाढला आहेसयाजीनी आपल्या दोन्ही मुलांना कष्टाचा पैसा मिळवण्याचा राजमार्ग दाखवला आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात आणि भाऊबंदीच्या वादात न पडता ती मुलंही मार्गस्थ होतील अशी आशा वाटते त्यांनी आपल्या नव्या घराजवळची दोन-तीन मोठी झाडे तोडल्यानंतर मी नाराजी व्यक्त केली होती आणि नवी झाडे लावण्याचा सल्लाही दिला होता आणि लवकरच त्यांनी आंध्र प्रदेशातून दोन-चार वर्षाची वाढलेली झाडे रस्त्यावर आणि आपल्या बागेमध्ये लावली आणि सारा परिसर हिरवा गार केलास्थानिक राजकारणापासून राज्यांतील ,देशातील राजकारणाची ग जाण सयाजीनाआहे. माणसांची चांगली पारख आहे कोण त्याना लँड माफिया म्हणतात पण ती टीका पचवून ते पुढेच जात राहतात फक्त स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहून आपलं कुटुंब आणि आपला व्यवसाय भला अशा थोड्याशा मर्यादित वर्तुळामध्ये सध्या सयाजी मोजक्या मित्राबरोबर पुढे पुढे जात आहेत. असे प्रतिपादन डॉक्टर सुभाष देसाई यांनी केले.
