कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत आ . राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीत झोपडपट्टी सर्वेक्षणाची अचूक व पारदर्शक अंमलबजावणी, पात्र लाभार्थ्यांची नोंद, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी आवश्यक नियोजन व कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत वेळेत पोहोचावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी , उपमहापौर, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागप्रमुख, महापालिकेचे अधिकारी नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.
