उत्तूर येथे मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीने गौरव… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर:विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून उत्तूर गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार गौरवपूर्ण वातावरणात करण्यात आला.

 

 

यामध्ये अक्षता प्रभाकर भाईगडे (उत्तूर) यांनी मुंबई पोलीस दलात मिळविलेल्या यशाबद्दल, साक्षी दयानंद उत्तूरकर (उत्तूर) यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसेच रोहन सुरेश भोसले (उत्तूर) यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

याचबरोबर ओमकार महादेव सावंत (उत्तूर) यांची भारतीय सैन्याच्या 49 AD Regiment मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

 

तसेच संजय गांधी निराधार समितीच्या आजरा तालुका अध्यक्ष पदी सुनील दिवटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

तसेच दैनिक सकाळचे पत्रकार अशोक तोरस्कर यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल जिल्हा परिषदेचा ‘आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

यावेळी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करताना त्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले. कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी मिळविलेल्या यशामुळे युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

🤙 8080365706