कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल मंत्री आबिटकर यांनी शासनाचे मानले आभार

मुंबई:राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई पवार व महायुती शासन यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय पाठपुरावा करून मार्गी लावत १५ हजार १० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करत, या ऐतिहासीक निर्णयाचे मनापासून स्वागत केले.

 

यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम कोल्हापूर ज़िल्हा अध्यक्ष डॉ. रमेश रेडेकर, उपाध्यक्ष डॉ. सतीश कोगनोळे, डॉ. विनायक लोहार, डॉ. संदीप बाटे डॉ. जयंत ठोंबरे डॉ. महेंद्र पाटील, डॉ. शैलेन्द्र पाटील,रुपाली पाटील, डॉ. सुशांती पाटील, डॉ. वैशाली पाटील, फर्माशिस्ट मा. संदीप पाटील, परिचारिका मा. जयंती आळतेकर आणि राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706