कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गोकुळ संलग्न दूध संस्थांचे १९६८ ठराव प्राप्त झाले आहेत. ठरावांची संख्या पाहता गोकुळ निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ठरणार, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. चेअरमन महायुतीचाच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावधारकांचा मेळावा झाला. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते. यानंतर ठरावधारकांनी शक्तिप्रदर्शन करत सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. मुश्रीफ म्हणाले, गोकुळमधील महायुतीच्या संचालकांनी गेली पाच वर्षे दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. म्हैस दुधाला १२ आणि गाय दुधाला प्रतिलिटर १० रुपये दरवाढ दिली.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँक संचालक राजेश पाटील, भैया माने, गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी संचालक युवराज पाटील, किसन चौगले, बाबासो खाडे आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
,
