शक्तिप्रदर्शन करताना केवळ ५०० ठरावच दाखल करावेत;सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांचे आवाहन 

कोल्हापूर:राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करताना प्रातिनिधिक स्वरूपात ५०० सभासद प्रतिनिधी ठराव एकावेळी सादर करावेत. उर्वरित ठराव कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने सादर करावेत, असे आवाहन सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले.

 

एकाच वेळी ठरावधारक मोठ्या संख्येने आल्याने कार्यालयात गोंधळ उडाला. ठराव स्वीकारणाऱ्या यंत्रणेवर ताण आला. वादावादीचे प्रसंगही उद्भवले. पुढील काळात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करणार असल्याचे समजते. यावेळीही असा गोंधळ होऊन संपूर्ण यंत्रणेसह ठरावधारकांची गैरसुविधा होऊ नये, यासाठी संबंधितांनी शक्तिप्रदर्शन करताना केवळ ५०० ठरावच दाखल करावेत, असे आवाहन केले आहे.

🤙 8080365706