कोल्हापूर:कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांच्या याचिकांवर गुरुवारी (दि. २५) सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंनी ६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, त्यावेळी पुढील सुनावणीबाबत चर्चा करू, असा आदेश दिला, दरम्यान अतिक्रमणावरील कारवाईप्रकरणी मागील आदेश कायम ठेवला.

तावडे हॉटेलप्रकरणी १ जून रोजी अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटिसांवर १७७मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. शासनाच्या बैठकीचे २४ जून रोजीच्या इतिवृत्ताची प्रत याचिकाकर्त्यांतर्फे वकिलांनी.न्यायालयात सादर करून त्याप्रमाणे झोनबदल आणि आरक्षण स्थलांतराबाबत कारवाईची मागणी केली. यावर महापालिकेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. याचिकाकर्त्यांनी प्रथम महापालिकेच्या हद्दीत आहोत हे मान्य करावे. त्यानंतर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीबाबत विचार करू, अशी भूमिका मांडली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावे.
प्रत्येकाने वैयक्तिक प्रतिज्ञापत्र द्यावे. ६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर झाल्यावर त्यावेळी पुढील सुनावणीच्या तारखेबाबत चर्चा करू, असे केले. न्यायालयाने स्पष्ट महापालिकेतर्फे अॅड. अभिजित आडगुळे आणि अॅड. नायडू यांनी काम पाहिले.
