कोल्हापूर : जिल्ह्यात माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेकरीता 24 परीक्षा केंद्रे असून परिक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

जिल्हयात ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात 16 जून ते 8 जुलै या परीक्षा कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वा. पासून ते सायं. 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन जवळ बाळगणे, त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही.
0000
