कोल्हापूर :मुख्य कार्यकारी अधिकारी, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्या पत्रानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे नामांतर करुन “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ” असे नाव देण्यास शासनाने दि. २० मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.

त्याचबरोबर कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यासाठीच्या पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक अनुज्ञप्तीधारक चालक यांना मंडळाचे सभासद म्हणून नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय ठाणे येथे कार्यरत असून मंडळाचा पत्ता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे, पूर्व द्रुतगती मार्ग, एल.आय.सी. इमारतीजवळ, लुईसवाडी, ठाणे (पश्चिम) – ४००६०४. असा आहे.
संबंधित प्रवासी वाहन चालक यांनी भविष्यात मिळणाऱ्या फायद्याचे लाभ घेण्यासाठी या कल्याणकारी मंडळाचे अधिकाधिक चालकांनी सदस्यत्व स्वीकारावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी केले आहे.
*****
