आ. चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश, गगनबावडा एसटी आगाराला ५ नवीन बसेसची भेट

गगनबावडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत गगनबावडा एसटी आगारासाठी मंजूर झालेल्या ५ नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा* उत्साहात पार पडला.

 

 

 

गगनबावडा व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि प्रवासी यांना दर्जेदार, सुरक्षित व सुलभ सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळावी यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी परिवहन मंत्री . प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच गगनबावडा आगाराला ५ नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत.

 

यावेळी बोलताना आ. नरके म्हणाले, “ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. सर्वसामान्य प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवासात सुसूत्रता आणि सुरक्षितता यावी यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. यापुढेही विकासकामांसाठी असेच प्रयत्न सुरू राहतील.”

 

 

या लोकार्पण सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन . पी. जी. शिंदे, गगनबावडा तहसीलदार रुपाली सूर्यवंशी,माजी सभापती एकनाथ शिंदे, डेपो मॅनेजर श्री. शिंगाडे तसेच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नवीन बसेसमुळ गगनबावडा ते कोल्हापूर, परिसरातील गावे आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

 

 

🤙 8080365706